सोयाबीन पोत्यांवर चोरट्यांचा डल्ला; शेतकरी हवालदिल
कुणाल जमदाडे | अहमदनगर | शिर्डीनजीक राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथिल शेतकरी गणेश गाढवे यांच्या सुमारे एकविस क्विंटल सोयाबिन वर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.
गाढवे यांना दोन एकर क्षेञ सुन त्यामध्ये खरिप हंगामात सोयाबीन हे पिक केले होते. त्यामध्ये त्यांना एकोनतीस गोण्यांमध्ये सुमारे एकविस क्विंटल सोयाबिन झाली होती व आधिक भाव मिळण्यासाठी त्याची साठवणुक करत त्यांनी आपल्या अस्तगाव परिसरातील सोयाबीन साठवून. पञ्याच्या शेडमध्ये ठेवले असता शनिवारी राञीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेडलगत असलेली जाळी पाठिमागच्या साईटला कापुण चोरट्यांनी सोयाबिनच्या गोण्या चोरुन नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन पोलिसांनी लवकरात लवकर या चोरांना पकडण्याची मागणि शेतकरी गणेश गाढवे यांनी केली आहे. राहाता पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आसुन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणि केली आहे.