भाजपाच्या ‘या’ नेत्याने ज्यांना जाकीट दिले त्यांना कोरोना…अजित पवारांची कोपरखळी
राज्याची कोरोना स्थिती व राज्य सरकारकडून यासंदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात देत असताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुन्हा राजकीय टोलेबाजी केली. राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोना झाल्याची माहिती देत असताना, भाजपच्या 'या' आमदाराने ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचे सांगितले.
अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोनाची लागण झाली नाही. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला कोरोना झाला नसेल, किंवा (प्रवीण दरेकर) यांचे जाकिट बघून तो जवळ गेला नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं, असं ते म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
तसेच तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशी शुभेच्छा देतो. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असं बोलून माझ्या नावावर पावती फाडाल", असाही चिमटा त्यांनी यावेळी काढला.
एका सदस्याने 'प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं' म्हणताच अजित पवारांनी "प्रसादने (भाजपा आमदार) मलाही जॅकेट दिलं होतं", असं म्हणत सूचक इशारा केला आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला.