Malegaon Crime : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या; मुलीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Malegaon Crime) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी, नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करत आक्रोश केला. सदर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. याप्रकरणी आता एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Summery
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून मुलीची केली हत्या
मुलीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
