वाघ शिकार प्रकरण; दोघा आरोपींना चार दिवसांची वन कोठडी
चंद्रपुर जिल्ह्यातील वाघ शिकार प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलीसांनी या प्रकरणात दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ११ नखे, मिशांचे १६ केस, चार हाडे व चार लहान दात जप्त केले आहेत. दरम्यान न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना चार दिवसांची वन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मरेगांव नियतक्षेत्रात एक महिन्यापूर्वी वाघाची शिकार करून त्याचे अवयव काढल्याचे धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणाचा आता वन विभागाने उलगडा केला आहे. या प्रकरणी नागेंद्र किसन वाकडे व सोनल अशोक धाडसे या दोन आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. यावरून या दोन्ही आरोपींना वन विभागाने ताब्यात घेत चौकशी केली असता, मरेगाव नियतक्षेत्रात त्यांना वाघाचा मृतदेह आढळला. आरोपींनी ज्या ठिकाणाहून वाघाचा मृतदेह मिळाल्याचे ठिकाण दाखविले तिथे पाहणी केली असता त्यांच्याकडून ११ नखे, मिशांचे १६ केस, चार हाडे व चार लहान दात जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची चार दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली.