माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ
कळंबोली इथले एसीसी सिमेंट प्लांटमध्ये काम करणारे अधिकृत माथाडी कामगारांवर दिवाळीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे. कंत्राटदार आणि माथाडी रेल्वे बोर्डाच्या संगनमतामुळे माथाडी कामगारांवर ही वेळ आलीय.
एससीसी सिमेंट कळंबोली इथे टोळी क्रमांक ३१ मध्ये १५६ कामगार आहेत.या कामगारांना एकीकडे काम करू दिले जात नाही मात्र त्यांच्या ऐवजी परप्रांतीय कामगारांना प्लांट मध्ये कामाची मुभा दिली आहे.त्यांचा वावर आतमध्ये सर्रास पाहायला मिळतेय.
दिवाळीच्या तोंडावर आमच्या हाताला काम नाही दादागिरीची भाषा रेल्वे माथाडी बोर्ड अधिकारी आणि कंत्राटदार आमच्यावर करत आहेत. मग रेल्वे माथाडी बोर्ड आमच्या हितासाठी आहे की कंत्राटदारांच्या हितासाठी हे स्पष्ट झाले पाहिजे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असेल तर या सगळ्या पेक्षा आम्ही आत्महत्या करू या रेल्वे बोर्डाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अशी प्रतिक्रिया विठ्ठल म्हारगुडे,युवराज खोत या माथाडी कामगारांनी दिली आहे.या बाबत आम्ही सहायक कामगार आयुक्त(रेल्वे बोर्ड) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तर दिली.
माथाडी कामगारांचे हित जपणे हे माथाडी रेल्वे बोर्डाचे काम आहे मात्र तेच त्यांचा घात करत आहेत. माथाडी घेत आहेत.येनकामगारांची कुठलीही बाजू ऐकून न घेता सहायक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे हे कंत्रातधार्जिनी भूमिका दिवाळीच्या तोंडावर कामगारांवर अन्याय केला जात आहे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.