marathi bhasha din
marathi bhasha din

माझा मराठीची बोलू कौतुके.. परि अमृतातेहि पैजासी जिंके… आज मराठी भाषा गौरव दिवस

Published by :
Siddhi Naringrekar

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस ( marathi language day ) म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी रोजी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्या जन्मदिनादिवशी 'मराठी भाषा दिवस' (( marathi language day ) साजरा केला जातो. साहित्यिक कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते.

मराठी भाषेचा इतिहास

देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. मराठी भाषेचा उदय संस्‍कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा 'महाराष्ट्री' या बोलीभाषेपासून झ़ाला, असे मानले जाते की, पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा वापर सर्वप्रथम केला. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला.

कवी कुसुमाग्रज

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मायबोली मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. विविध मराठीप्रेमी  21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा 'मायबोली मराठी सप्ताह' म्हणून साजरा करतात. शिवाय 1999 वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com