महाराष्ट्र
आज पालखी सोहळ्याचा 15 वा दिवस
आज पालखी सोहळ्याचा 15 वा दिवस असून परंपरेनुसार या दिवशी वारीच्या वाटेवर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील सराटी गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. त्यापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पादूकांना निरा नदीत स्नान करण्यात येते. यंदा मात्र देहूतच हा कार्यक्रम संपन्न झाला. यंदा संस्थानच्या विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुखांनी संत तुकाराम महाराजांच्या पादूकांना निरा स्नान देहूतील इंद्रायणी नदीतच केलय. बुधवारी निरा नदीतील पाणी संस्थानने आणले. त्यानंतर आज इंद्रायणी नदीत पादूकांना दोन्ही नदीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आलाय. तसेच आरती करण्यात आली. यावेळी पुंडलिकावर देच्या गजराने इंद्रायणीचा काठ दुमदुमुन गेला.