Breaking News : विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणाचा अहवाल हक्कभंग समितीने अध्यक्षांसमोर ठेवला; अध्यक्ष अहवालाच आज करणार वाचन
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. मुंबई अधिवेशनात झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असून या प्रकरणाचा अहवाल काल हक्कभंग समितीने अध्यक्षांसमोर ठेवला. त्यानंतर आज या अहवालाचे अध्यक्ष वाचन करणार असल्याची माहिती मिळत आहे. या अहवालानुसार कोणावर कारवाई होणार किंवा कोणावर गुन्हा नोंद होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
आज हिवाळी अधिवेशनचा 4 था दिवस
विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरण
हक्कभंग समितीने अहवाल अध्यक्षांसमोर ठेवला
