Maharashtra Winter Session : आज अधिवेशनाचा पाचवा दिवस; राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session ) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे. विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. यातच आता विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून लक्षवेधी मांडण्यात आली असून अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी अंतर्गत कंत्राटदाराकडून 20 कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा सभागृह समोर मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
आज अधिवेशनाचा पाचवा दिवस
राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता
