Angarki Chaturthi : नव्या वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी; मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

आज नव्या वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Angarki Chaturthi ) आज नव्या वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. या निमित्ताने गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह राज्यभरातील गणपती मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्याने या व्रताला विशेष महत्त्व आहे. मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी झाली असून यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Summary

  • नव्या वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे.

  • माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्याने या व्रताला विशेष महत्त्व

  • मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com