Maharashtra Assembly Monsoon Session : आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार; अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात होणार चर्चा
(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले आणि आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच विद्यार्थ्यांचे आणि आरोग्य विभागातील घोटाळा तसेच बांधकाम विभागातील भ्रष्टाचार या विषयांवरून आज शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबतच अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर दिल्यानंतर विरोधी आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदा होतील.
काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला गेला असून यावर काय कारवाई होणार, हे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहात सांगणार आहेत. यासोबतच जन सुरक्षा कायदा विरोधात विरोधक एकवटले असून यालाही आज विरोध करण्यात येईल.जन सुरक्षा विधेयकावर काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.