Beed
Beed

Beed : आज ऊस दरवाढीसाठी चक्काजाम आंदोलन

ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Beed ) ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत. ऊस दराच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येत आक्रमक पवित्रा घेत असून ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. माजलगाव येथे 11.00 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

ऊस दरवाढीसाठी चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून आजपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे व ऊसतोडी बंद ठेवून ऊसतोड व वाहतूक बांधवांनी सहकार्य करण्याचे व संभाव्य नुकसान टाळण्याचे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे.

जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला चार हजार रुपये प्रमाणे दर देण्यात यावा त्याचबरोबर एक रकमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी माजलगाव येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात येणार आहे.

Summery

  • बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या

  • ऊस दरवाढीसाठी चक्काजाम आंदोलनाचा इशारा

  • ऊसाला 4 हजार रुपये भाव देण्याची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com