Walmik Karad : वाल्मिक कराडचा जामिनासाठी अर्ज; पुढील सुनावणी 'या' तारखेला, काय निर्णय होणार?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Walmik Karad) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांवर खून आणि मकोका कायद्यानंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असून पुढील सुनावणी आता 16 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
वाल्मिक कराडचा मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज
जामीन अर्जावरील आजची सुनावणी संपली
कराडच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 16 डिसेंबरला
