Cruise Drug Case | आर्यन खानचा आजचा मुक्कामही आर्थर रोड जेलमध्ये

Cruise Drug Case | आर्यन खानचा आजचा मुक्कामही आर्थर रोड जेलमध्ये

Published by :
Published on

क्रुझ ड्रग्ज पार्टी केस प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार. त्यामुळे आर्यनला आजची रात्रदेखील आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागणार आहे.

विशेष म्हणजे तीन ते चार तास सेशन एनडीपीएस विशेष कोर्टात आज सुनावणी झाली. पण ही सुनावणी आता उद्या ढकलण्यात आली आहे. एनसीबीकडून वकिल अद्वैत सेतना व अनिल सिंग हे बाजू मांडली तर आर्यन खानकडून ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश माने-शिंद यांनी युक्तीवाद केला. आज 5 तासाहून अधिक काळ सुनावणी नंतर मुंबईत एनडीपीएस कोर्टाने सुनावणी उद्यावर ढकलली.

आर्यन खानच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी होणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी केसमध्ये आरोपींच्या जामीनावर उद्या दुपारी 12 नंतर एनसीबीचा युक्तिवाद सुरू राहील. आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड जेलमध्येच असेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com