Mumbai : मुंबईतील शौचालयांमध्ये ना पाणी ना वीज; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल काय?

Mumbai : मुंबईतील शौचालयांमध्ये ना पाणी ना वीज; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल काय?

मुंबईत शौचालयांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Mumbai ) मुंबईत शौचालयांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. यातच आता प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील 69 टक्के शौचालयांत पाणी नाही त्यासोबतच वीज देखील नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2025’ हा अहवाल प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केला असून यामध्ये मुंबईतील स्वच्छता व आणि वायू प्रदूषण समस्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालयांची अवस्था खूप खराब असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

महिलांसाठी शौचालये अपुरी पाहायला मिळत असून सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 86 आणि स्त्रीयांची संख्या 81 असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच किनाऱ्यालगत असलेल्या पाण्याची प्रदूषण पातळी जास्त वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करावे, अशी मागणी प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com