महाराष्ट्र
पुण्यातील पर्यटनस्थळं आजपासून खुली; लोणावळ्यात पर्यटकांची हजेरी
सुशांत डुंबरे | पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवार आजपासून खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केली. रा्ज्यातील पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुलं झालंय. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. काही निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने त्यांना गुलाबी थंडीचा आनंद अगदी निर्धास्तपणे घेता येणार आहे. सात महिन्यानंतर सुरू झालेल्या पर्यटनामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे.