बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई

बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई

Published by :

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेल्या पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या बेशिस्त पार्किंग मध्ये पोलिसांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात पार्क केलेल्या असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आज चक्क पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई केली स्टेशन परिसरात रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्क करण्यात आलेल्या गाड्यांवर चलनाच्या माध्यमातून कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नियम सर्वांना सारखेच आहे. असा संदेश जनसामान्यांना पोलिसांनी कारवाईतून दिला आहे.

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस नेहमी रिक्षाचालक व नो-पार्किंग मध्ये बेशिस्तपणे लावलेल्या वाहनावर कारवाई करतात. मात्र या नो-पार्किंगला पार्क केलेल्या गाड्यामध्ये पोलिसांच्या गाड्या देखील उभ्या असतात. त्यामुळे अनेकदा या गाड्यावर कारवाई करताना पोलिसांसमोर पेच निर्माण होत होता. याबाबत संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील बेशिस्त पार्किंग सुरू असल्याने अखेर कल्याण वाहतूक पोलिसांनी आता पोलिसांच्या गाड्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान कल्याण पश्चिम मधील वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी स्टेशन परिसरात बेशिस्तपणे रस्त्यावर लावलेल्या पोलिसांच्या दुचाकींवर कारवाईचा बडगा उचलत 100 हून अधिक पोलिसांच्या गाड्यावर इ चलनाच्या माध्यमातून कारवाई केली . त्याचबरोबर स्टेशन परिसरात पोलिसांनी गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये असे आवाहन ही केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com