Transgender Marriage | एका लग्नाची दुसरी गोष्ट…

Transgender Marriage | एका लग्नाची दुसरी गोष्ट…

Published by :
Published on

प्रतिनिधी : संदीप जेजुरकर
लोकशाही न्यूज, मनमाड ( नाशिक ) 
प्रेम कुणावर करावं..प्रेम कुणावरही करावं , प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं, दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं , 'प्रेम कुणावरही करावे. ह्या अत्यंत गाजलेल्या ओळी आहेत कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील. आणि या ओळी सार्थ ठरविल्या आहेत नाशिकच्या येवला Yewla तालुक्यातील मातुलठाण येथील प्रेमात पडलेल्या संजय झाल्टे या तरुणाने समाजात काही अंशी दुर्लक्षित असलेल्या किन्नरच्या प्रेमात पडून थेट विवाह करत एक आगळा वेगळा आदर्श त्याने समाजासमोर ठेवलाय.

नाशिकच्या येवला तालुक्यातील मातुलठाण येथे  राहणाऱ्या संजय संजय झाल्टे याचे ' टिक टॉक ' या सोशल मीडियाच्या माध्यमातून मनमाडच्या किन्नर ( तृतीयपंथी ) Transgender Marriage असलेल्या ' शिवलक्ष्मी ' सोबत घट्ट मैत्री जडली..या मैत्रीचं रूपांतर प्रेमात देखील झालं. चॅटिंग, फोन कॉल्स यावर बोलणं सुरू झाल्याने मग दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या विवाहास दोघांच्या कुटुंबीयांनी आनंदाने संमतीही देवून टाकली. सोयरीक जुळविण्यासाठी वराकडची मंडळी वधूला बघण्यासाठी आले. अन रीतसर लग्नाची मागणी घातली. वधूकडील मंडळी देखील वरपक्षाकडे वर बघण्यासाठी गेली.दोघांचीही पसंती झाल्यानंतर मनमाड जवळील प्राचीन शिवमंदिर असलेल्या नागापूर येथे वैदिक पद्धतीने तृतीयपंथी असलेल्या वधू शिवलक्ष्मी व वर संजय यांच्या लग्नाचा बार उडविण्यात आला. लग्नगाठ बांधल्यावर या दोघांनीही भोले शंकराला साक्षी मानून ' सात फेरे '  घेत  ' सात जन्माच्या ' आणाभाका घेतल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com