महाराष्ट्र
एकाच कार्डवर मेट्रो, बेस्ट, मोनोतून प्रवास
सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एकाच तिकिटाचा पर्याय देणाऱ्या एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी मेट्रो २ दहिसर ते डी.एन.नगर आणि दहिसर ते अंधेरी या मेट्रो सातसाठी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कडून देण्यात आली आहे.
सध्या या दोन्ही मार्गावर मेट्रो रेल्वेगाडय़ांची चाचणी सुरु आहे. एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

