Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarTeam Lokshahi

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त खास उपक्रम

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका वनविभागाच्या वतीने, वड आणि पिंपळाच्या 250 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले
Published by :
Team Lokshahi
Published on

रत्नागिरी: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका वनविभागाच्या वतीने, गुहागर तालुक्यात चिखली, तवसाळ खुर्द व अन्य ठिकाणी वड आणि पिंपळाच्या 250 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी चिखली गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ भगवान भाई कदम, ग्रामपंचायत सदस्य निर्भय दळवी, , महेश साळवी, बाबू कदम, दीपक कदम, कमलेश कदम उपस्थित होते. तर तवसाळ खुर्द येथील वृक्षारोपणावेळी सरपंच सौ प्रियांका सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, किरण गडदे, अमोल सुर्वे, कामिल नरवणकर, प्रकाश सुर्वे, उदय शीरधनकर, कृषी सखी स्मिता शिरधनकर, चंद्रकांत निवाते, कैलास मोहीते, ग्रामविकास अधिकारी महेंद्र निमकर याचबरोबर वनपाल गुहागर संतोष परशेटे, वनरक्षक अरविंद मांडवकर, वनरक्षक संजय दुंडगे, कासव मित्र ऋषिकेश पालकर आदी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com