Video : भिडेंच्या वादग्रस्त विधानावर बोलताना महात्मा गांधींचे पणतू भावूक; म्हणाले...

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना 'लोकशाहीच्या मुद्द्या'वेळी तुषार गांधी भावूक झाले होते.

मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानावरुन विरोधक आता आक्रमक झाले असून संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशातच, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना 'लोकशाहीच्या मुद्द्या'वेळी तुषार गांधी भावूक झाले होते.

संभाजी भिडे यांच्या विधानावरुन अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. संभाजी भिडे यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

तर, नाना पटोले यांनीही संभाजी भिडेंवरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. हे भाजपचा पिल्लू आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांना बदनाम करणे हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यातील भाजपा सरकार हे संभाजी भिडे यांच्या पाठीशी आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

तसेच, ही विचारधारा समाजामध्ये भेद निर्माण करत असेल तर त्याला विरोधात कारवाई व्हायला हवी. त्यांचं वक्तव्य चुकीचे आहे असं मी म्हणेल. त्यांना भाजपच पाठबळ असू शकते, त्यांना संरक्षण आहे याचा अर्थ त्यांना भाजपच पाठबळ असू शकतं, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com