Nashik : नाशिकचे दोन माजी महापौर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार पक्षप्रवेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकचे दोन माजी महापौर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेत प्रवेश करणार असून खासदार हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील शिवसेनेकडून सातपूरमध्ये उमेदवार आहे. तर अशोक मुर्तडक देखील अपक्ष निवडणूक लढत आहेत.
Summary
नाशिकचे दोन माजी महापौर शिवसेनेत करणार प्रवेश
दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक करणार शिवसेनेत प्रवेश
खासदार हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना
