अभिमानास्पद! चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये कोकणातील दोघांचा सहभाग

अभिमानास्पद! चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये कोकणातील दोघांचा सहभाग

भारताची चांद्रयान मोहिम 3 यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. या मोहिमेच्या टीममध्ये कोकणातीलही दोघाचा सहभाग होता
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | चिपळूण : भारताची चांद्रयान मोहिम 3 यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. यासोबतच भारताने इतिहास रचलेला आहे. या मोहिमेच्या टीममध्ये कोकणातीलही दोघांचा सहभाग होता. रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर व संगमेश्वर कुंभार खानी येथील पार्थ अजित सुर्वे या दोघांनीही चांद्रयान मोहिमेत वाटा आहे.

अभिमानास्पद! चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये कोकणातील दोघांचा सहभाग
आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाचे सहा हजार पानी लेखी उत्तर; काय आहेत मुद्दे?

रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर ही विद्यार्थ्यांनी इस्त्रोमध्ये काम करीत आहे. तर संगमेश्वर कुंभार खानी येथील पार्थ अजित सुर्वे हा सुध्दा इस्रो ग्रुपमध्ये काम करीत आहे.

चांद्रयान ३ मोहिमेसंबंधात तिच्या या सहभागाबद्दल व यानाच्या यशस्वी लँडिंगबाबत सर्वच इसरो टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेला ही बाब अभिमानास्पद आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिमानास्पद ठरलेल्या या चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये या कोकणमधील दोघांचा सहभाग होता. त्यामुळे जिल्हावासियांना अभिमान वाटत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com