Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ समोर; जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्विट

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Jitendra Awhad ) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच्याआधी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते.आता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे व्हिडिओ ट्विट केलं आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, 'एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.'

'आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com