‘जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन’, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा

‘जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन’, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा

Published by :

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद झाला होता. या वादावर पडदा पडण्याची शक्यता असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा उफाळताना दिसतोय. कारण जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु होताच राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय.

संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते, चांगल्या पद्धतीची अॅक्शन झाली तर रिअॅक्शनही तशी असेल, असंही सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात जे दाखल होत आहेत त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे त्यांनी सांगावं. GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे, अशी टोलेबाजी सामंतांनी केलीय.

जन-आशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितलं असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव साहेबांना मानणारे नेते आहोत. उद्धव साहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितलं आहे, असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com