“लवकरच सत्तांतर… मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट राजकीय तडजोडीसाठीच”

“लवकरच सत्तांतर… मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट राजकीय तडजोडीसाठीच”

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची भेट राजकीय तडजोडीसाठी असल्याचं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय.

पंतप्रधान मोदींना भेटायला जाण्याअगोदर राज्य सरकारने चर्चा करून अधिवेशन बोलावणे गरजेचे होते. मात्र तसं न करता थेट दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे ही बैठक राजकीय तडजोड असल्याची टीका उदयनराजेंनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट राजकीय तडजोडी साठीच घेतली असून या भेटीतून सत्तांतर होऊन घेवाण-देवाण होणार असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

'मुस्लीम समाजाला पुरा आणि हिंदू समाजाला जाळा' एवढेच बाकी राहिले असून एवढी आग या आरक्षणामुळे लोकांच्या मनात पेटली असल्याचं. देखील त्यांनी अधोरेखित केलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com