Uddhav Thackeray - Aaditya Thackeray : शाखा नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी ठाकरे मैदानात; उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज शाखांना भेटी देणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray - Aaditya Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज शाखांना भेटी देणार आहेत. शाखा नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे संध्याकाळी मुंबईतील शाखांना भेटी देणार असून उद्धव ठाकरे लालबाग-परळमधील शाखांना भेटी देणार आहेत. लालबाग-परळमध्ये दोन उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.
Summary
मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी
शाखा नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी ठाकरे मैदानात
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मुंबईतील शाखांना देणार भेटी
