Uddhav Thackeray : हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याचा अंदाज
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे.
याच पार्श्वभूमीवर आज हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे अधिवेशनात पूर्णवेळ बसत नाही म्हणून सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आज उद्धव ठाकरे येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस
महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत होणार
हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याचा अंदाज
