Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे लक्ष
थोडक्यात
उद्धव ठाकरेंची आज महत्वाची पत्रकार परिषद
मतदार यादीतील घोळाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत
मतदार यादीतील घोळ उघड करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना
(Uddhav Thackeray) निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील घोळाविरोधात विरोधकांनी काल महाएल्गार पुकारला . महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. या मोर्चातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक आरोप केले आहेत. मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या 'सत्याचा मोर्चा'मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.
यातच आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. मतदार यादीतील घोळाबाबत शनिवारच्या मोर्च्यानंतर उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेची आगामी काळातील रणनीती जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
