Uddhav Thackeray- Raj Thackeray : मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची काही जागांवर रस्सीखेच सुरू; 'या'जागांचा तिढा कायम
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray- Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संवाद साधला. यातच आता मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
माहिम, शिवडी, भांडुप, विक्रोळीत जागांचा तिढा कायम असून शिवडीतील 2 जागा ठाकरेसेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.याच पार्श्वभूमीवर आता जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
ठाकरे बंधूंच्या जागवाटपात अद्यापही रस्सीखेच सुरू
माहिम, शिवडी, भांडुप, विक्रोळीत जागांचा तिढा कायम
शिवडीतील 2 जागा ठाकरेसेनेला तर 1 जागा मनसेला देण्याचा निर्णय
