Uddhav Thackeray : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "मला सकाळपासून विविध ठिकाणांहून फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नाव वगळली जात आहेत, काही ठिकाणी शाई पुसली जात आहे."
"मला असं वाटते निवडणूक आयुक्त पगार कसला घेतात याचा खुलासा झाला पाहिजे. निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे. हा निवडणुकीचा, याद्यांचा गोंधळ थांबवला गेला पाहिजे. नाही तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे." असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Summary
29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार
उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला
"निवडणुकीचा, याद्यांचा गोंधळ थांबवला गेला पाहिजे"
