बाळासाहेब यांच्यासोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरे म्हणाले...

बाळासाहेब यांच्यासोबतचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरे म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देत त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यावेळी अनेक नेत्यांनी ट्विट करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली दिली आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देत त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

'आपले प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची ताकद…', असे कॅप्शन उध्दव ठाकरेंनी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेदेखील आहेत.

नुकताच उद्धव ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले होते. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले. तर, डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. त्यानंतर सायंकाळी अनंत कान्हेरे मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com