Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : आजपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडा दौरा करणार

  • 5 ते 9 नोव्हेंबर मराठवाडा दौरा करणार

  • पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद

(Uddhav Thackeray) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.

धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा या दौऱ्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या 5 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसा असेल ठाकरेंचा मराठवाडा दौरा ?

छत्रपती संभाजीनगर येथून दौऱ्याला सुरूवात होणार

सकाळी 10 वाजता पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद

सकाळी 11.30 वाजता बीडमधील पालीच्या शेतकऱ्यांशी संवाद

दुपारी 2 वाजता भूममधील पाश्रुडच्या शेतकऱ्यांशी संवाद

दुपारी 3.30 वाजता परंडातील शिरसावपालीच्या शेतकऱ्यांशी संवाद

सायंकाळी 5 वाजता बार्शी तालुक्यातील घारीपालीच्या शेतकऱ्यांशी संवाद

सायंकाळी 7 वाजता धाराशीवच्या शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com