Uddhav Thackeray Meet Sanjay Raut : "लवकरच ते मैदानात तलवार घेऊन...."; राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
राजकारणात आक्रमक बोलणी आणि विरोधकांना चिमटे घेणारे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत सध्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याची सूचना दिली असून, त्यांनी घराबाहेर पडणे थांबवले आहे. मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या घरी भेट देण्यासाठी भांडूपला पोहोचले. यावेळी त्यांनी संजय राऊतांची तब्येत विचारली आणि ते लवकरच पुनः सक्रिय होणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय खूप फ्रेश दिसले, लवकरच ते मैदानात तलवार घेऊन दिसतील."
संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून बाहेर पडणे बंद केले होते, मात्र 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला ते शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी मास्क लावलेला होता आणि सुनील राऊत यांचा आधार घेत ते स्मृतीस्थळापर्यंत गेले. संजय राऊत यांचे अचानक होणारे तब्येतीचे बदल आणि त्याच्या उपचारांवर लक्ष ठेवले जात आहे.
