Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याचपार्श्वभमूिवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. याचपार्श्वभमूिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत, "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" असं महत्त्वाच वक्तव्य केलं आहे.

दरम्यान पुढे ते म्हणाले की, "हा जो निंदनीय प्रकार घडलेला आहे. हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात. एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते, ज्याला स्वत:च्या आई-वडिलांच नाव घ्यायला लाज-शरम वाटते.अशा कोणत्यातरी लावारिस व्यक्तीने केलं असणार. दुसरं म्हणजे, बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला. त्याप्रमाणेच कोणाचा तरी महार्श पेटवण्याचा उद्योग असू शकतो".

"तुर्तास पोलीस यासर्व प्रकरणाचा शोध घेत आहेत. आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे बघू पुढे काय होत. पोलीस म्हणताय आम्ही आरोपींना शोधून काढू. पण मी पुन्हा असं सांगतो दोनच प्रकारचे व्यक्ती यात असू शकतात, आमच्या भावना तीव्रच आहेत पण मी सगळ्यांना शांत रहायला सांगितलं आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com