महाराष्ट्र
ठाकरे गटाचे रवींद्र डोळस यांचा कमबॅक, हकालपट्टीचे आदेश मागे, नक्की काय आहे प्रकरण?
रवींद्र डोळस आता पुन्हा ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील रवींद्र डोळस यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले होते. मात्र हा निर्णय आता मागे घेतला आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत झालेली कारवाई विनायक राऊतांच्या सहीने हकालपट्टीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ते ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गैरसमजुतीतून हे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जारी केलेल्या नवीन पत्रकातून रवींद्र डोळस यांच्यावर केलेली कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.