ShivSena SC Hearing : शिवसेना कुणाची? उल्हास बापट म्हणाले, कायद्यातून पळवाट...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि इलेक्शन कमिशनचा निःपक्षपातीपणे निर्णय येणे या दोनवर पुढचं राजकारण अवलंबून आहे. लवकर निर्णय घेतले जात नाही हा न्यायव्यवस्था आणि राजकारणातला दोष आहे. कायद्यातून पळवाट शोधल्या जातात. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना वेळ दिला पणं तो उलटून गेला याचा दुरूपयोग केला जातो. बहुमत शिंदेकडे असेल तरी पाहिले दोन भाग हे उद्धव ठाकरेंकडे आहेत. विधानसभेचे आमदार यांचं बहुमत धरलं तर त्याने लोकशाहीची विकृती होईल. ठाकरेंना सोडून गेलेले आमदार हे पक्षाच्या नाव आणि चिन्हावर निवडून आलेत व्यक्तिगत निवडून आली नाही. लोकप्रतिनिधींना अनेक मार्गांनी बाहेर खेचलं हे लोकशाहीला फार घातक आहे, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com