पेन्सिलवर कोरले नाव; तरूणाकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा !

पेन्सिलवर कोरले नाव; तरूणाकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा !

Published by :
Published on

आदेश वाकळे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त विविध स्तरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. याप्रमाणेच संगमनेरच्या एका तरूणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव शिस पेन्सिलवर कोरत त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज १७ सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसाचे निमित्ताने संगमनेर येथील ध्येयवेडा युवक प्राणीमित्र भूषण नरवडे याने चक्क शिस पेन्सिलच्या नोक अर्थात लीडवर देशाचे पंतप्रधान मोदी यांचे नरेंद्र दामोदरदास मोदीजी हे नाव कोरून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.हे कोरवी काम करण्यास त्यांना जवळपास 8 तास लागले आहे.या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com