महाराष्ट्र
Ganeshotsav : Amravati : अमरावतीत 75 किलो ड्रायफ्रूटपासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती
यंदाच्या गणेशोत्सवात अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जय हिंद गणेशोत्सव मंडप विशेष चर्चेत आला आहे.
(Ganeshotsav) यंदाच्या गणेशोत्सवात अमरावतीच्या बडनेरा परिसरातील जय हिंद गणेशोत्सव मंडप विशेष चर्चेत आला आहे. येथे 6 फूट उंचीची इको-फ्रेंडली आणि अनोखी गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली असून ती पूर्णपणे 75 किलो खारीक (ड्रायफ्रूट) पासून बनविण्यात आली आहे. मंडपातील कार्यकर्त्यांनी दोन महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली आहे.
75 किलो खारीक बारकाईने जोडून, सजवून आणि आकार देऊन बाप्पाचे रूप तयार करण्यात आले आहे. दरवर्षी गणेशमूर्ती काहीतरी वेगळ्या आणि प्रेरणादायी रूपात साकारता येते हा संदेश या प्रयोगातून दिला आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी दूरहून भाविक येथे दाखल होत आहेत. बाप्पाचे हे अनोखे रूप सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.