सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्यांचं नुकसान
आधीच शेतकरी अनेक प्रसंगाला सामोरे जात आहे त्यामध्ये पिकाचा नुकसान केल्याचा प्रकार समोर आला. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ या गावातील शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याने मोठे नुकसान शेतकऱ्याला झालं आहे.
अंबादास सोनार असे शेतकऱ्यांचे नाव असून हनुमंत लांडगे यांची हनुमंत लाडंगे यांनी बटाईने केली आहे. सोनार यांच्या चार एक्कर मध्ये 50 हजार रुपये खर्च करून लांडगे यांनी सोयाबीन पेरले होते. उत्पन्न चांगले होइल अशी अपेक्षा होती पंधरा दिवसापूर्वी या सोयाबीनची काढणी करण्यात आली मात्र अतिृष्टीमुळे शेतात पाणी असल्याने सोयाबीन भरडण्याची मशीन शेतात नेता आली नाही, त्यामुळे या सोयाबीनची गंज करून ठेवण्यात आली. मात्र आज पहाटेच्या दरम्यान कुणी तरी अज्ञात व्यक्तीने या सोयाबीनच्या गांजीला आग लावली त्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही.