“…तोपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेऊ नये” – गंभीर
दहशतवादी कारवायांसाठी पैसै पुरविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पाकिस्तानने जी पावले उचलली आहेत त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्याचे निरीक्षण 'एफएटीएफ'ने नोंदवले आहे. दहशतवादी कारवायांमुळे या लिस्टच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलेल्या पाकिस्तानसंदर्भात गंभीरला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "जोपर्यंत ते सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवत नाहीत तोपर्यंत मला नाही वाटत आपण पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचं नातं ठेवलं पाहिजे. कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सैनिकांचा जीव अधिक महत्वाचा आहे," असं गंभीर म्हणाला.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आता भाजपा खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असे सांगितले. गंभीरने एका निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान असे वक्तव्य केलं आहे. यासोबतच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता गंभीरने, "क्रिकेट एक खूप छोटी गोष्ट आहे. आपल्या जवानांचे प्राण अधिक महत्वाचे आहेत. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळता कामा नये," असं मत नोंदवलं. असे त्याने वक्तव्य केलं आहे.