UPSCची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार

UPSCची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार

Published by :
Published on
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. शुक्रवारपासून होणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. बुधवारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.देशभरातून जवळपास 9,200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी आणि काही राजकीय नेत्यांकडून होत होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचं सांगितलं आहे.  

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com