महाराष्ट्र
Mumbai Vaccination | मुंबईत उद्या लसीकरण बंद
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या 3 जून रोजी लसीकरण होणार आहे. महापालिकेच्या ट्वीटर अकाउंटवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
गुरुवार दिनांक ३ जून २०२१ रोजी ४५ वर्षावरील वयोगटाचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार नाही. शासकीय, महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या लसीकरण होणार नाही आहे. दरम्यान उद्या लसीकरण का बंद असणार आहे, याबाबत ठोस कारण सांगण्यात आले नाही आहे. तसेच कोविन अॅपवर नागरिकांनी स्लॉट पाहून बुकिंग करत लसीकरण केंद्रावर येण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे