Prakash Ambedkar : मुंबईत वंचित बहुजन आघाडी 200 जागांवर लढण्यास सज्ज; प्रकाश आंबेडकर यांनी केलं जाहीर
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Prakash Ambedkar ) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत वंचित बहुजन आघाडी 200 जागांवर लढण्यास सज्ज असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी केली आहे. सुमारे 200 जागांवर उमेदवार उभे करण्याचा आमचा निर्धार आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 'मुंबईमध्ये काँग्रेसकडून युतीच्या बाबतीत सांगितले जाते की आम्ही तयार आहोत. पण, जाहीर करायचे म्हटले की म्हणतात थांबूया ! मुंबई मनपामध्ये आम्ही 200 जागांवर लढण्याचा तयारीत आहोत. अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
Summary
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचं ठरलं
200 जागांवर लढण्यास सज्ज- प्रकाश आंबेडकर
मुंबईत स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी- आंबेडकर
