Vande Mataram
Vande Mataram

Vande Mataram : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज घुमणार वंदे मातरम् गीत; मात्र उर्दू शाळेत वंदे मातरम् गायलं गेलं नाही, लोकशाही मराठीचा रिअ‍ॅलिटी चेक

दिल्लीत शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • दिल्लीत शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात समुहगान

  • उर्दू शाळेत गायन नाही,लोकशाहीचा रिअ‍ॅलिटी चेक

(Vande Mataram)आज वंदे मातरम या गीतास 150 वर्षे पूर्ण होता आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे आयोजित 'वंदे मातरम्' शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव सोहळा वर्षभर साजरा होणार असून,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. दिल्लीत शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव साजरा केला जाईल.

तर, मुंबईतही आज हा महोत्सव साजरा होताना दिसणार आहे. यानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी 10 वाजता 'वंदे मातरम्'चं समूहगान होणार आहे. तसचं या निमित्ताने सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य असणार आहे.

'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर २०२५ या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक केला तर राज्यातील उर्दू शाळेत शासन आदेश पाळला गेल्या नसून बहुतांश उर्दू शाळेत वंदे मातरम् गीताचं समूह गायन केलं नसल्याचे पाहायला मिळाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com