राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वसंत मोरेंचे ट्विट; 'पद आज आहे उद्या नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी नाराज पुण्यातले मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) दाखल झाले होते. यावेळी वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मी भेटीनंतर १०० टक्के सामनाधी असून समाधानी होऊनच इथून जातोय असं सांगितलं. त्यामुळे मनसे साथ सोडण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला.त्यातच आता वसंत मोरे (Vasant More) यांनी ट्विट केले आहे.या ट्विटची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतली. या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आपल्या प्रभागात भोंगे लावण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची मनसे शहर अध्यक्ष पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मोरे पक्ष सोडणार असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होती. मात्र आज राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतल्यानंतर “मी १०० टक्के समाधानी आहे,” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मी भेटीनंतर १०० टक्के सामनाधी असून समाधानी होऊनच इथून जातोय असं सांगितलं. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्या ठाण्यात होणाऱ्या उत्तरसभेत सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं म्हटलंय. “सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया वसंत मोरेंनी (Vasant More) दिलीय. तसेच पत्रकारांनी तुम्ही या भेटीनंतर समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी १०० टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं.
मी १०० टक्के समाधानी
“मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलंय. “ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात का?”, असा प्रश्न मोरेंना विचारण्यात आला. त्यावर, “उद्याची उत्तर सभा आहे उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरं देतील,” एवढं मोजकं उत्तर मोरेंनी दिलं. तसेच, “बाकी जे बोलायचं आहे ते राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार आहेत,” असंही मोरे यांनी सांगितलं.
मी आपला इथेच बरा!
वसंत मोरे यांनी आता एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी मनसे पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्य़ा. मोरे ट्विटमध्ये म्हणतात, आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले अरे इथे तर मी काहीच हरवले नाही. उगाचच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा!