Vegetable Price Hike 
महाराष्ट्र
Vegetable Price Hike : अतिवृष्टीचा फटका; भाज्यांची आवक कमी, दर मात्र वाढले
घाऊक बाजारात भाज्याचे दर दुप्पट
थोडक्यात
अतिवृष्टीचा भाजीपाल्याला फटका
भाज्यांची आवक घटल्यानं किंमती वाढल्या
घाऊक बाजारात भाज्याचे दर दुप्पट
(Vegetable Price Hike ) राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे शेतमालाला याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत असून अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या आहेत.
याचा परिणाम म्हणून मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. काही ठिकाणी तर वाटाणा आणि शेवग्यासारख्या भाज्यांची किंमत 200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले.
