vel amavasya : लातूरात ‘वेळ अमावस्या’ उत्साहात साजरी
वैभव बालकुंदे, लातूर | ऐरवी अमावस्या म्हणजे अशुभ मानतात मात्र आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड या भागतले शेतकरी वेळ अमावस्येचा सन आनंदाने साजरा करतात. यावेळी शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय करीत असतात.
भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेतीशी संबंधीत अनके सण, उत्सव साजरे होतात. यातीलचं एक सण म्हणजे वेळ अमावस्या. मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.
मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही वेळ अमावस्या असते हिरव्या शिवारात आप्तेष्ठाना नैसार्गिक भोजनाचा आनंद घेण्यासाठी शेतकरी आमंत्रण देतात. यावर्षी देखील हा सन तितक्याच उत्साहात साजरा होतोय. सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते. तसेच पिकांची देखील पुजा केली जाते. झाडाखाली पाच दगड ठेवून पांढ-या रंगाने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय करीत असतात.