Ram Sutar
महाराष्ट्र
Ram Sutar : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन; वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(Ram Sutar) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नोएडातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहेत.
देशभरात राम सुतार यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. नुकतीच त्यांनी 19 फेब्रुवारी रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती.
कारकिर्दीच्या 60 वर्षांत त्यांनी 200हून अधिक भव्य शिल्प तयार केलीत. अनेक जगप्रसिद्ध शिल्पे घडवली होती. नुकताच राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारही जाहीर झाला होता.
