अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात जय्यत तयारी

अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात जय्यत तयारी

अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

सुरेश वायभट | पैठण | अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पैठण शहरातून उद्या सकाळी 8:30 वाजता खंडोबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रामाची भव्य प्रतिमा साकरली असुन हि प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

यावेळी रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे,रेणुकादेवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने पैठणनगरी श्रीरामाच्या भव्य प्रतिमा व फलकांनी सजविण्यात आली आहे. यामुळे शहरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यासाठी पैठण शहर व ग्रामीण भागातील रामभक्तांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन रेणुकादेवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com